GSAT – 11 : जीसॅट -११ चं यशस्वी प्रक्षेपण

0
249

GSAT – 11 : जीसॅट -११ चं यशस्वी प्रक्षेपण

जीसॅट – ११ या भारताच्या सर्वांत अवजड उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण युरोपियन अवकाश केंद्राच्या फ्रेंच गुएना येथून करण्यात आलं आहे. यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होण्यास मदद मिळणार आहे.

या उपग्रहाचं वजन तब्बल ५ हजार ८५४ किलो असून, जमिनीपासून ३६ हजार कि.मी. अंतरावर तो स्थिरावणार आहे. याचे सोलर पॅनल चार मीटरपेक्षा लांब आहेत, यावरून याच्या भव्यतेचा अंदाज आपल्याला बांधता येईल.

जीसॅट – ११ उपग्रह यावर्षीच्या मार्च-एप्रिल महिन्यात प्रक्षेपित करण्यात येणार होता. मात्र, जीसॅट – ६ए चं प्रक्षेपण अयशस्वी ठरल्यामुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबणीवर पडलं होतं. २९ मार्च रोजी जीसॅट – ६ए चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. मात्र, प्रक्षेपित केल्यानंतर लगेचच याचा संपर्क तुटला होता. या प्रकारानंतर जीसॅट – ११ उपग्रह प्रक्षेपित न करण्याचा निर्णय घेण्यात आला. जीसॅट – ११ च्या अनेक चाचण्या घेतल्यानंतर हा उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करण्यात आला.

*जीसॅट – ११ ची वैशिष्ट्ये*

१. हा संपर्क उपग्रह असल्यामुळे कनेक्टिव्हिटीसाठी गेम चेंजर ठरणार आहे. या उपग्रहाच्या कार्यारंभानंतर देशातील इंटरनेटचा स्पीड कमालीनं वाढणार आहे.

२. जीसॅट – ११ च्या माध्यमातून प्रति सेकंद १०० जीबी ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे.

३. जीसॅट-११ हा उपग्रह अनेक गोष्टींसाठी सक्षम मानला जातो. यामुळे संपूर्ण देशाचं भौगोलिक क्षेत्र अवाक्यात येऊ शकणार आहे. यामध्ये वापरण्यात आलेले बीम अद्ययावत आहेत.

४. इंटरनेटचा स्पीड वाढल्यामुळे आणि देशाचं भौगोलिक क्षेत्र अवाक्यात येणार असल्यामुळे ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळणे सुलभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here