सर्वात मोठी रात्र

0
15

सर्वात मोठी रात्र

आज शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे उत्तरायणारंभ होत असून शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. दिनमान सर्वात लहान १० तास ५७ मिनिटांचे असून रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची असणार आहे. तसेच उद्या शनिवारपासून दिनमान वाढत जाणार आहे.
पूर्वी चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू असे समाज समजत होता. मात्र ते चुकीचे असून ऋतू हे चांद्र महिन्यांप्रमाणे होत नसतात. 
ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य ज्या दिवशी सायन मीन राशीत ( १८ फेब्रुवारी ) प्रवेश करतो त्यावेळी वसंत ऋतूचा प्रारंभ होतो, सायन वृषभ (२० एप्रिल) ग्रीष्म ऋतू, सायन कर्क (२१ जून) वर्षा ऋतू, सायन कन्या (२३ आगस्ट ) शरद ऋतू, सायन वृश्चिक (२३ आक्टोबर) हेमंत ऋतू, सायन मकर (२१-२२ डिसेंबर) शिशिर ऋतूचा प्रारंभ होत असतो.
दरवर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिनमान व रात्रीमान समान असते. २१ जून रोजी दिनमान मोठे (१३ तास १४ मिनिटे) असून त्या दिवशी रात्र सर्वात लहान (१० तास ४६ मिनिटांची) असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here